दोन फ्लॉप फिल्मनंतर 'या' अभिनेत्यानं बॉलिवूडमधून गाशा गुंडाळला; आता सांभाळतोय 4700 कोटींचं साम्राज्य, ओळखलं का याला?
Guess Who? बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीला अलविदा केलं. एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपटांनंतर अनेकांनी बॉलिवूडला अलविदा म्हटलं आणि इतर क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टारबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या करिअरमध्ये पहिले दोन चित्रपट फ्लॉप ठरले होते, त्यानंतर त्यानं बॉलीवूडला अलविदा करण्याचं ठरवून टाकलं. पण आज हा अभिनेता शंभर कोटींची कंपनी चालवतोय. हे कोण आहेत, ते आम्हाला कळू द्या?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवयाच्या 27 व्या वर्षी बॉलिवूडला अलविदा करणारा हा अभिनेता दुसरा कोणी नसून गिरीश कुमार तौरानी आहे. गिरीशनं 2013 मध्ये श्रुती हसनसोबत असलेल्या Ramaiya Vastavaiya या रोमँटिक चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
अंदाजे 40 कोटी रुपयांमध्ये बनलेला Ramaiya Vastavaiya भारतात 25 कोटी रुपयेही कमवू शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला.
तब्बल तीन वर्षांनी गिरीशचा लवशुदा हा दुसरा चित्रपट रिलीज झाला. नवनीत कौर ढिल्लन आणि नवीन कस्तुरिया यांची भूमिका असलेला हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
19 फेब्रुवारी 2016 रोजी लवशुदा रिलीज होण्याच्या काही दिवस आधी, 11 फेब्रुवारी रोजी गिरीशनं त्याची लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड कृष्णासोबत लग्न केलं. दरम्यान, अभिनेत्यानं जवळजवळ एक वर्ष आपलं लग्न सीक्रेट ठेवलं आणि त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये त्यानं त्याच्या लग्नाबाबत खुलासा केला. गिरीशनं याबाबत बोलताना सांगितलं होतं की, लग्नामुळे माझ्या करिअरवर कोणताही परिणाम होऊ नये, असे मला वाटत होतं.
अभिनय सोडल्यानंतर गिरीश कुमार तौरानी यांनं त्यांचे वडील कुमार तौरानी आणि टिप्स इंडस्ट्रीजचे मालक असलेले काका रमेश तौरानी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली.
गिरीशच्या अभिनयात पुनरागमन करण्याबाबत सध्या कोणतेही अपडेट नाही.