Ganesh Utsav 2022 : मराठी दिग्दर्शकांच्या घरी बाप्पाचं आगमन

'गोजिरी', 'पांडू' अशा अनेक लोकप्रिय सिनेमांचा दिग्दर्शक विजू मानेच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विजू मानेच्या घरी बाप्पाचरणी दिलेली दक्षिणा 'दिलासा वृद्धाश्र' या संस्थेस देण्यात येणार आहे.
नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'अनन्या' सिनेमाचा दिग्दर्शक प्रताप फडच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत प्रतापने सोशल मीडियावर बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत.
मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्धांसने जल्लोषात बाप्पाचं स्वागत केलं आहे.
समीर विद्धांसने बाप्पासाठी आकर्षक सजावट केली आहे.
अनेक लोकप्रिय सिनेमांचा दिग्दर्शक केदार शिंदेच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
केदार शिंदेने बाप्पाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,आपल्या घरचा गणपती... गणपती बाप्पा मोरया...
रवी जाधवच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर त्याने बाप्पासोबतचे फोटो शेअर केले आहेत.