Fatima Sana Shaikh: कोणता अभिनेता आवडतो? फातिमा सना शेख म्हणाली...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'कोणता अभिनेता आवडतो?'असा प्रश्न फातिमाला नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.या प्रश्नाला फातिमानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'कोणता अभिनेता आवडतो?' असा मुलाखतीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर फातिमा म्हणाली,'मी शाहरुख खानची फॅन आहे पण मला वाटते की, आमिर खानने रंग दे बसंती, पीके, पीपली लाइव्ह असे अनेक चित्रपट दिले आहेत आणि हे सर्व चित्रपट एकमेकांपेक्षा वेगळे आहेत.'
'तिच्यावर कोणत्या चित्रपटांचा प्रभाव झाला आहे?' असं जेव्हा फातिमाला मुलाखतीमध्ये विचारण्यात आले.तेव्हा ती म्हणाली,'कुछ कुछ होता है. मला हा चित्रपट खूप आवडतो.'
फातिमा सना शेख लवकरच मेघना गुलजार यांच्या सॅम बहादूर या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'मेट्रो इन दिनों'या अनुराग बासू यांच्या आगामी चित्रपटात देखील फातिमा सना शेख काम करणार आहे.
फातिमाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
फातिमाला दंगला या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तिनं कमल हसन (Kamal Haasan) यांच्या 'चाची 420' (Chachi 420) या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते.