Traditional Outfit Ideas : लग्नसराईत स्टायलिश दिसायचंय? Jennifer Winget प्रमाणे 'हे' ट्रेडिशनल आउटफिट ट्राय करा
लग्नाच्या कोणत्याही फंक्शनमध्ये ट्रेडिशनल आउटफिट असणं गरजेचं आहे. पण तुम्हालाही पारंपरिक पोशाखात वेगळा लूक द्यायचा असेल तर तुम्ही जेनिफरच्या या आउटफिट्समधून प्रेरणा घेऊ शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्रेडिशनल आणि स्टायलिश असा लूक हवा असेल, तर तुम्ही जेनिफरप्रमाणे लाल साडीचा पर्याय निवडू शकता. ऑफ शोल्डर ब्लाउजसोबत तुम्ही रेड साडी नेसू शकता. हेवी ज्वेलरी घालून तुम्ही तुमचा लुक पूर्ण करू शकता.
ऑफ व्हाइट कलरमधील शराराही अतिशय ग्लॅमरस लूक देतो. सध्या शरारा आणि गरारा खूप ट्रेंडमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही हलक्या आणि साध्या एम्ब्रॉयडरी डिझाइन असलेला शरारा कॅरी करू शकता.
कोणत्याही पार्टी फंक्शनसाठी जेनिफरप्रमाणे तुम्हीही अनारकली सूट घालू शकता. तुमच्या आवडीनुसार, तुम्ही लाईट किंवा डार्क कलरचा पर्याय निवडू शकता.
सध्या सिल्क फॅब्रिकचा ट्रेंड आहे. तुम्ही जेनिफरप्रमाणे सिल्क लेहेंगा ट्राय करु शकता. मिनिमल मेकअप, डार्क लिपस्टिक, बन हेअरस्टाईल आणि गजरा लावून जेनिफरने हा लूक पूर्ण केला आहे.
डीप नेक ब्लाऊज आणि फ्लेअर लेहेंग्यामध्येही तुम्ही सुंदर दिसाल. मॅचिंग ज्वेलरी आणि सुंदर हेअरस्टाईलमुळे तुमचा लूक उठून दिसेल.
स्टायलिश लूकसाठी तुम्ही शेरवानी ड्रेसही निवडू शकता. यासोबत मोठे इअररिंग्स आणि हिल्ससह तुम्ही स्टनिंग दिसाल.
ब्लॅक साडीमध्येही तुम्ही जेनिफरप्रमाणे सुंदर दिसाल. ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन अधिक लक्ष वेधून घेईल.
तुम्ही जेनिफरप्रमाणे रेडीमेड साडीचा पर्यायही निवडू शकता. अशी रेडीमेड साडी नेसताना जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. साडीमुळे तुम्हांला छान एलिगंट टचही मिळेल.
अगदी सिंपल पण तितकंच स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही अनारकली ड्रेसची निवड करु शकता. हेवी एअररिंग्स आणि मेसी बन हेअरस्टाईलसह तुम्ही हा लूक पूर्ण करू शकता.