बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतला व्हायचंय आई, म्हणाली..

Rakhi Sawant : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने 'बिग बॉस 15' मध्ये (Bigg Boss 15) पती रितेशला जगासमोर आणून सर्वांना आश्चर्यचकित केले. (photo:rakhisawant2511/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यादरम्यान दोघांचे लग्न कायदेशीर नसल्याचे अनेक खुलासे झाले. (photo:rakhisawant2511/ig)

'बिग बॉस 15' हा शो आता संपला आहे आणि नंतरही राखी अनेकदा पती रितेशसोबत स्पॉट झाली आहे. मात्र, आता राखीने रितेशशी (Ritesh) अधिकृतपणे लग्न करणार नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच तिने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (photo:rakhisawant2511/ig)
राखी सावंतने ई-टाइम्सशी बोलताना सांगितले की, ‘मी रितेशसोबत खूप आनंदी आहे. माझ्या पतीवरचे सर्व आरोप खोटे आहेत, हे मला माहीत आहे. त्याच्याबद्दल जे सांगितले जात आहे, तसा तो अजिबात नाही. मी आता काही काळ त्याच्यासोबत आहे आणि मी त्याला चांगले ओळखते. तो बेल्जियमहून आला आणि त्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात दाखल झाला. त्याने मला खूप प्रेम दिले आहे.’ (photo:rakhisawant2511/ig)
राखीने असेही सांगितले की, आता ती रितेशशी अधिकृतपणे लग्न करणार नाही, पण तिला रितेशसोबत तिचे भविष्य घडवायचे आहे. ती म्हणाली, लोक काहीही म्हणतील, पण रितेश हा नवरा मटेरिअल आहे. मला एवढेच माहीत आहे की, तो माझ्यासाठी खूप चांगला आहे आणि तो एक चांगला नवरा असल्याचे सिद्ध करेल. आम्ही एक चांगले कपल बनवू आणि जर सर्व काही ठीक झाले, तर लवकरच आम्हाला मुलेही होतील. (photo:rakhisawant2511/ig)
राखी सावंत खूप स्पष्टवक्ती आहे. बिनधास्त बोलण्यास ती अजिबात मागेपुढे पाहत नाही. काही दिवसांपूर्वी राखीचा पतीला लिपलॉक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर तिने आपल्या पतीबद्दल तक्रारही केली होती. माझा स्पर्श होताच रितेश लाजतो, म्हणून आम्ही अजून हनिमूनला देखील गेलो नाही, असे राखी म्हणाली होती. (photo:rakhisawant2511/ig)