PHOTO : लग्नानंतर तीन महिन्यांतच दिया मिर्झानं दिला गोंडस बाळाला जन्म
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झानं मुलाला जन्म दिला आहे. दिया आणि पती वैभव रेखी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. (Photo : @diamirzaofficial instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदियानं आपल्या मुलाचं नावही ठरवलं आहे. Avyaan Azaad Rekhi असं दियानं बाळाचं नाव ठेवलं आहे. (Photo : @diamirzaofficial instagram)
अभिनेत्री दिया मिर्झानं पोस्टमध्ये सांगितलं की, बाळाचा जन्म 14 मे रोजी झाला. प्रीमॅच्युअर डिलीवरी झाल्यामुळे देखरेखीसाठी त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. जवळपास दोन महिन्यांनी आज पोस्ट शेअर करत दिया मिर्झानं चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली. (Photo : @diamirzaofficial instagram)
दिया मिर्झानं सांगितलं की, गरोदरपणात झालेल्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले होते. अशातच तत्काळ C-section द्वारे तिची डिलीवरी करण्यात आली. त्यामुळे वेळेआधीच बाळाचा जन्म झाला. (Photo : @diamirzaofficial instagram)
दिया मिर्झा आणि वैभव रेखी आपल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच अभिनेत्रीनं सांगितलं की, बाळाचे आजी-आजोबा आणि बहिण समायराही त्याच्यासोबत खेळण्यासाठी उत्सुक आहेत. (Photo : @diamirzaofficial instagram)
दरम्यान, हा दिया मिर्झाचा हा दुसरा विवाह आहे, याच वर्षी 15 फेब्रुवारी रोजी दिया मिर्झाने वैभव रेखी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. (Photo : @diamirzaofficial instagram)
दिया तिच्या खासगी जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. जीवनातील एका वादळाला सामोरं गेल्यानंतर हे सुख तिला लाभणार असल्याचं दियानं त्यावेळी सांगितलं होतं. यापूर्वी 2014 मध्ये दियानं साहिल संघा याच्याशी लग्न केलं होतं. 5 वर्षांच्या सहजीवनानंतर या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. (Photo : @diamirzaofficial instagram)
वैभव रेखींसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर एप्रिलमध्ये दिया मिर्झानं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत गरोदर असल्याची गोड बातमी शेअर केली होती. (Photo : @diamirzaofficial instagram)
(Photo : @diamirzaofficial instagram)