PHOTO : वडिलांना पाहून विमानतळावरच ढसाढसा रडू लागली सोनम कपूर, नेमकं काय घडलं?
काल रात्री बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लंडनहून मुंबईत आली. एअरपोर्टवर रिसिव्ह करण्यासाठी आलेल्या वडिलांना पाहून सोनमला अश्रू अनावर झालं. अनिल कपूर यांना पाहून सोनमला रडू कोसळलं. (Photo : Manav Mangalani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून सोनम कपूर लंडनमध्ये पती आनंद आहुजासोबत राहत होती. (Photo : Manav Mangalani)
काल रात्री सोनम कपूर मुंबईला परतली. त्यावेळी अनिल कपूर तिला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते. (Photo : Manav Mangalani)
सोनमने जसं वडिलांना पाहिलं ती रडू लागली. इतक्या दिवसांनी घरी परतल्यामुळे सोनमला अश्रू अनावर झाले. (Photo : Manav Mangalani)
सोनमला पाहून अनिल कपूरही काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी सोनमला मिठी मारत शांत केलं आणि दोघेही एकत्र घरी जाण्यासाठी निघाले. (Photo : Manav Mangalani)
दरम्यान, सोनम कपूरचं सासर दिल्लीमध्ये आहे. पण ती आपला पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहते. (Photo : Manav Mangalani)
यावेळीचा सोनमच्या लूकबाबत बोलायचे तर ती प्रिंटेड स्कर्ट आणि ब्लू जॅकेटमध्ये दिसून आली. (Photo : Manav Mangalani)
अनिल कपूर ब्लॅक कॅज्युअल लूकमध्ये दिसून आले. कोरोना नियमांचं पालन करत दोघांनीही मास्क लावले होते. (Photo : Manav Mangalani)
(Photo : Manav Mangalani)