Shocking: 'या' अभिनेत्रींचा संतापजनक अनुभव, स्वत:सोबत घडलेले छेडछाडीचे भयंकर प्रकार सांगितले
Shocking: आपल्या देशात स्त्री सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. छेडछाड, बलात्काराच्या दुर्दैवी घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. सामान्य मुलींप्रमाणंच बॉलिवूडमधील अभिनेत्रींनाही अशा संतापजनक प्रकारांना सामोरं जावं लागलं आहे. अभिनेत्रींनी आपले अनुभव स्वत: सांगितले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिपाशा बासू (Bipasha Basu) 'जिस्म' सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये गेली होती. तिथं एका अनोळखी व्यक्तिनं तिची छेड काढली होती. त्यावेळी तो व्यक्ती पळून जात असताना जॉन अब्राहमनं त्याला पकडलं होतं.
झायरा वसीम (Zaira Wasim) सोबत दिल्लीहून मुंबई जात असलेल्या फ्लाईटमध्ये एका वयस्कर व्यक्तिनं छेडछाड केली होती.
स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नं सांगितलं होतं की, सुरक्षा असताना देखील तिच्यासोबत 'प्रेम रतन धन पायो' च्या शूटिंगवेळी छेडछाड झाली होती.
दंगल' फेम फातिमा सना शेखनं सांगितलं होतं की, तीन वर्षांची असताना तिचं लैंगिक शोषण झालं होतं.
सोनम कपूर (Sonam Kapoor) ला देखील वयाच्या 13 वर्षी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला होता.
दीपिका पादुकोण (Deepika Padukone) 14-15 असताना तिच्यासोबत छेडछाड झाली होती. तिनं याबाबत एका मुलाखतीत सांगितलं होतं.
सुष्मिता सेन (Sushmita Sen) ला एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये एका 15 वर्षाच्या मुलानं छेडलं होतं.
कल्कि कोचलिन (Kalki Koechlin)नं सांगितलं होतं की, ती 9 वर्षांची असताना तिचं लैंगिक शोषण झालं होतं.