Deepika Padukone-Ranveer Singh : नवखी चाहुल..! दीपिका-रणवीरचं फोटोशूट, व्यक्त केला आईबाबा होण्याचा आनंद
अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या तिच्या मातृत्वाचा काळ अनुभवत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतच तिने तिच्या सोशल मीडियावर बेबी बंपचे काही फोटो शेअर केले आहे.
दीपिका आणि रणवीरच्या या फोटोंनी साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
ब्लॅक आऊटफिटमध्ये मॉम टू बीचा ग्लॅमरस अंदाजही पाहायला मिळतोय.
तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत पुन्हा एकदा या जोडप्याचं अभिनंदन केलंय.
अनेक दिवसांपासून दीपिकाच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरु आहेत.
तिचे सोशल मीडियावर फोटोही व्हायरल होतायत.
त्यातच तिच्या या फोटोशूटने विशेष लक्ष वेधून घेतलंय.
काहीच दिवसांत दीपिका आणि रणवीरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावरुन यासंबधात माहिती दिली होती.
28 सप्टेंबरला दीपिका तिच्या बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं जातंय.
तसेच दीपिकाला मुलगा होणार की मुलगी याचीही उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.