Photo : हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या दारा सिंगचा बाल विवाह, मुमताज सोबत अपूर्ण लव्हस्टोरी
दारा सिंग यांचं खरं नाव दिदार सिंग रंधवा असं होतं. त्यांनी फक्त कुस्तीच नाही तर अभिनय क्षेत्रातही खूप नाव कमावलं. दारा सिंग यांनी आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये प्रचंड यश मिळवलं. पण त्यांची लव्ह स्टोरी मात्र अपूर्ण राहिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदारा सिंग अवघे 14 वर्षांचे असताना त्यांच्या घरच्यांनी त्यांचा विवाह लावला होता. 1937 मध्ये दारा सिंह यांनी बचनो कौर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले. जी वयाने दारासिंग यांच्यापेक्षा खूप मोठी होती.
अल्पवयीन असतानाचं दारा सिंह वडील बनले होते. मात्र लग्नाच्या 10 वर्षानंतर दारा सिंग आणि त्यांची पत्नी बचनो कौर एकमेकांपासून वेगळं झाले.
यानंतर त्यांनी 1961 मध्ये सुरजीत कौरसोबत दुसरा विवाह केला. त्यावेळी दारासिंग सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होते. या दोघांचे वैवाहिक जीवन खूप चांगलं राहिलं. यांना 3 मुले आणि 3 मुली असा परिवार आहे. त्यापैकी एक अभिनेता विंदू दारा सिंग आहेत.
दारा सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री मुमताज यांचं प्रेमप्रकरण प्रचंड चर्चेत होतं. पण त्यांचं प्रेम अपूर्णचं राहिलं असं म्हटलं जातं.
जेव्हा दारा सिंग त्यांचा दुसरा सिनेमा 'फौलाद'साठी अभिनेत्रीच्या शोधात होते तेव्हा त्यांची मुमताज यांच्याशी भेट झाली. नेमकं त्याचवेळी मुमताज त्यांच्या बहिणीसोबत सेटवर पोहोचल्या आणि दारा सिंह यांनी मुमताजला पाहताच तिला आपल्या सिनेमाची नायिका म्हणून फायनल केलं. यानंतर दारा सिंगनी मुमताज यांना त्यांच्या सिनेमासाठी करारबद्द केलं होतं.
1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फौलाद' सिनेमात दारा सिंह आणि मुमताज यांनी एकत्र काम केलं होतं. यादरम्यान त्यांच्या प्रेमप्रकरणाची खूपच चर्चा केली जातं होती. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मुमताज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपलं मजबूत स्थान निर्माण केलं. पुढे मुमताज सिनेमाच्या शुटींगमध्ये इतकी गुंतली की ती बॉलिवूडची सर्वात व्यस्त अभिनेत्री बनली.
यामुळे तिला दारा सिंगला भेटण्यासाठी वेळ काढता येत नव्हता. यानंतर दोघांमध्ये अंतर वाढत गेलं आणि दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत.
दारा सिंग यांची मुमताजसोबतची प्रेमकाहाणी अपयशी ठरल्यानंतर ते आतून प्रचंड कोसळले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दारा सिंग एकदा म्हणाले होते की, 'बॉलिवूडने माझ्याकडून मुमताजला हिसकावून घेतलं आहे.'