NEET UG Result 2023: लातूरचा 'नीट'पॅटर्न... उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ढोल-ताशाच्या तालावर जल्लोष!
वैद्यकीय अभ्यासक्रमात पूर्व परीक्षाचा निकाल कोविढ नंतर काही प्रमाणात मंदावला होता ...मात्र यावर्षी निकालाने सगळे विक्रम मोडीत काढले आहेत .. यावर्षी निट परीक्षेत दीड हजार पेक्षा जास्त मुले हि वैद्यकीय महाविद्यालयात पक्का प्रवेश घेऊ शकतील एवढ्या गुणांची त्यांनी कमाई केली आहे ....
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकाच शहरातील हाताच्या बोटावर मोजता येथील एवढ्या कॉलेज मधून आणि खासगी कोचिंग क्लास यांच्या माध्यमातून थोडी थोडकी नव्हे तर दीड हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एमबीबीएस मध्ये प्रवेश पक्का केल्याचं समोर आलंय... हा आहे लातूर पॅटर्न...
संपूर्ण राज्यातच नाही तर आता आदेश पातळीवर लातूर पॅटर्नचा गवगवा होत आहे.... लातूर येथील नावाजलेली महाविद्यालय त्यात राजषी शाहू महाविद्यालय दयानंद महाविद्यालय रिलायन्स लातूर पॅटर्न बसवेश्वर महाविद्यालय.
त्याच बरोबर येथे असणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थ्यांनी लातूर पॅटर्न वाढविण्यात योगदान दिले आहे
तसेच लातूर शहरांमधील खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे निकाल लागल्यापासून फक्त फटाक्याची आतिषबाजी आणि ढोल-ताशाच्या तालावर थिरकणारे विद्यार्थी आणि शिक्षक ठिकठिकाणी दिसत आहेत.
कोविड काळानंतर अशा प्रकारचे घवघवीत यश सेलिब्रेट करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा एकच जल्लोष दिसत आहे.
दहावी मध्येही लातूर मधील अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केलेली आहे... त्यामुळेच अकरावी बारावीच्या महाविद्यालयातील शिक्षकांना या गुणवत्ता पूर्ण विद्यार्थ्यांना शिकवताना कस लावावा लागतो... त्यामुळेच या निकालाची उंची हळूहळू वाढत चालली आहे ..देशभरात ही याची नोंद घ्यावी लागेल ...
एक महाविद्यालय किंवा खाजगी कोचिंग क्लासेस नव्हे तर येथील वातावरणातून तयार होणारा या लातूर पॅटर्न मध्ये महाविद्यालय खाजगी कोचिंग क्लासेस इथले मेस इथे असणारा हॉस्टेल्स विद्यार्थ्यांमध्ये असणारे शैक्षणिक वातावरण या सगळ्यांचा परिणाम म्हणून हा निकाल लागला आहे...
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी काम करणाऱ्या अनेक एजन्सी लातूरमध्ये आहेत.. त्यांच्या मतानुसार यावर्षी देशपातळीवर चा निकाल उत्तम लागला आहे.. लातूरच्या निकालामध्ये यावर्षी वाढ दिसून येते आहे.. जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांच्या आसपास वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची क्षमता लातूरच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केली आहे
1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी 500 पेक्षा जास्त गुण घेत नीट परीक्षेत यश मिळवले आहे .... 720 पैकी 700 पेक्षा अधिक 04 गुणवंत आहेत...650 गुण घेणारे 55 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत...तर 600 गुण घेणारे 223 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत .. हा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत .. निकाल अद्याप अपडेट केला जात आहे