In Pics: असे बॉलिवूड कलाकार ज्यांनी एक नाही, दोन नाही तर तीनदा केलं लग्न, एका अभिनेत्रीचाही समावेश
5. नीलिमा अजीम: या यादीत एकमेव अभिनेत्रीचं नाव आहे. ते म्हणजे नीलिमा अजीम. नीलिमानं पहिलं लग्न पंकज कपूरसोबत केलं. नीलिमा आणि पंकज यांनी शाहिद कपूरला जन्म दिला. पंकज कपूर यांच्याशी नातं संपल्यानंतर नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी लग्न केलं. या दोघांना ईशान खट्टर हा मुलगा. राजेश यांच्यासोबत लग्न तुटल्यानंतर नीलिमा यांनी 2004 मध्ये उस्ताद रजा अली खान यांच्याशी लग्न केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App4. कमल हासन: साउथ सुपरस्टार कमल हासननं देखील तीन लग्न केली आहेत. 1978 मध्ये त्यांनी क्लासिकल सिंगर वाणी गणपतिसोबत लग्न केलं. 10 वर्ष चाललेल्या त्यांच्या संसारानंतर एकमेकांशी सोडचिठ्ठी घेतली. त्यानंतर कमल हासन यांनी सारिकासोबत लग्न केलं. त्यानंतर कमल हासन गौतमीसोबत लिव-इन-रिलेशनमध्ये होते. कमल हासन आणि गौतमीने लग्न केल्याचे दावे केले जात आहेत.
3. सिद्धार्थ रॉय कपूर: फिल्म मेकर सिद्धार्थ रॉय कपूरनं आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर एका टिव्ही निर्मातीसोबत लग्न केलं. दोन्ही लग्न तुटल्यानंतर त्यांनी अभिनेत्री विद्या बालनसोबत लग्न केलं.
2. करण सिंह ग्रोवर: अभिनेता करण सिंह ग्रोवर सध्या तिसरी पत्नी बिपाशा बासूसोबत संसार करत आहे. त्याने 2008 मध्ये अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केलं. काही महिन्यानंतर दोघांनी सोडचिठ्ठी घेतली. त्यानंतर करणनं 2012मध्ये अभिनेत्री जेनेफर विंगेटसोबत लग्न केलं. विंगेटसोबतही नातं न टिकल्यानं त्यानं बिपाशासोबत लग्न केलं.
1. संजय दत्त: अभिनेता संजय दत्तनं तीन लग्न केली आहेत. आता तो तिसरी पत्नी मान्यतासोबत संसार करत आहे. मान्यताच्या आधी संजय दत्तनं 1996 मध्ये ऋचा शर्मासोबत पहिलं लग्न केलं होतं. ऋचाचा कॅन्सरनं मृत्यू झाल्यानंतर संजूबाबानं रिया पिल्लईसोबत दुसरं लग्न केलं. रियाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यानं मान्यतासोबत लग्न केलं.
बॉलिवूड कलाकारांची रिअल लाईफ स्टोरी देखील खूप फिल्मी असते. आज आम्ही आपल्याला अशा पाच कलाकारांबद्दल सांगणार आहोत. जे एक नाही, दोन नाही तीनदा प्रेमात पडले आणि लग्नही केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -