In Pics : विठुरायाच्या लग्नासाठी खास पोशाख, बंगळुरुच्या फॅशन डिझायनरने बनवला पेहराव
यंदा कोरोनामुळे मात्र हा विवाहसोहळा केवळ मोजक्या मंडळींच्या उपस्थतीत साजरा होत असल्याने यंदा वऱ्हाडी मंडळींच्या संख्येला ब्रेक लागला आहे .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसविता चौधरी यांनी बंगळुरुमध्ये आपला फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरु केल्यावर पहिला पेहराव देवाचा बनवला आहे. वसंत पंचमी ते रंग पंचमी हा विठुरायाच्या विवाह सोहळ्याच्या कालावधीत देवाला व रुक्मिणी मातेला पांढरी वस्त्रे परिधान केली जात असतात.
विठुरायाच्या बाराबंदीच्या अंगीवर शंख, चक्र व ओम या खुणा रंगीत मणी आणि मोत्याच्या साहाय्याने अतिशय आकर्षक पद्धतीने बनविल्या आहेत . तर रुक्मिणी मातेलाही पांढऱ्या शुभ्र उच्च प्रतीची रेशमी कांजीवरम साडी अर्पण केली आहे .
सध्या लग्न म्हणाले की बस्ता आला आणि नवरा नवरीचे खास पोषाखही मुख्य आकर्षण असते . पण वसंत पंचमीला होणाऱ्या देवाच्या विवाहाला बंगळुरु येथील व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या सविता चौधरी यांनी विठुराया व रुक्मिणी मातेच्या विवाह पेहराव डिझाइन केला आहे .
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -