Celebs Choose Red Wedding Outfit : बॉलिवूड बालांचा नववधू साज; आऊटफिट, ज्वेलरीसह अनेक गोष्टी खास
Celebs Choose Red Wedding Outfit : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी आपली लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दिवशी कतरिना लाल रंगाच्या नववधू पेहरावात दिसून आली. विकी आणि कतरिना दोघांनीही आपल्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापूर्वीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या लग्नासाठी लाल रंगाच्या पेहरावाची निवड केली होती. भारतीय संस्कृतित विशेषतः लग्नसोहळ्यात लाल रंगाला विशेष महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतरिना कैफनं आपल्या लग्नात प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीनं डिझाइन केलेला मटका सिल्कचा लेहंगा वेअर केला होता. ज्यावर गोल्डन अँज सिल्वर जरदोसीनं बारीक भरतकाम करण्यात आलं होतं. कतरिना या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
अभिनेत्री पत्रलेखानंही आपल्या लग्नात लाल रंगाचा पेहराव केला होता. तिच्या पेहरावात सर्वात लक्षवेधी ठरली तिची चुनरी (ओढणी). त्यावर बंगाली भाषेत राजकुमार रावसाठी खास संदेश लिहिला होता. तिच्या चुनरीवर 'मी माझं प्रेमळ मन तुला समर्पित करतेय असं लिहिलं होतं.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चौप्राचा ब्रायडल लूकही चर्चेचा विषय ठरला होता. प्रियांकानं आपल्या लग्नासाठी लाल रंगाच्या लेहंगा वेअर केला होता. तसेच त्यासोबत तिनं डायमंड ज्वेलरी मॅच केली होती.
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह यांच्या वेडिंग लूकही चाहत्यांना खूप आवडला होता. रणवीरनं लाल रंगाची शेरवानी आणि दीपिकानं लाल रंगाचा लेहंगा वेअर केला होता.
बॉलिवूडची सिंगर नेहा कक्कडनंही आपल्या लग्नात लाल रंगाचा लेहंगा वेअर केला होता. तिचाही लूक लक्षवेधी ठरला होता. त्यावेळी नेहा कक्कडनं प्रियांका चोप्राचा वेडिंग लूक कॉपी केल्याचंही बोललं जात होतं.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नसोहळ्याच्या चर्चाही बी-टाऊनमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. सोनमनं लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. पण त्यावेळी सोनमच्या ज्वेलरीच्या चर्चा रंगल्या होत्या. तिची ज्वेलरी युनिक आणि क्लासी होती.
अभिनेत्री ईशा देओलनंही आपल्या लग्नात लाल रंगाचा लेहंगा वेअर केला होता. दाक्षिणात्य स्टाईल लूकमध्ये इशा अत्यंत सुंदर दिसत होती.
अभिनेत्री बिपाशा बासू आपल्या लग्नात बंगाली साज केला होता. लग्नासाठी तिनंही लाल रंगाच्या लेहंग्याची निवड केली होती.