Vivek Oberoi : मी खरं प्रेम केलं, पण मला फसवलं गेलं; ऐश्वर्यासोबतच्या अफेअरवर विवेक ओबेरॉयची खंत
विवेक ओबेरॉय केवळ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या अनेक भूमिका हिट ठरल्या आहेत. अष्टपैलू अभिनय आणि वेगळ्या शैलीमुळे विवेक ओबेरॉयचा वेगळा चाहता वर्ग आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरिअरशिवाय वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या रायसोबतच्या त्याच्या अफेअरची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
सध्या विवेक आणि ऐश्वर्या आपापल्या जोडीदारासह आपापल्या आयुष्यात आनंदी असले तरी अलीकडेच विवेकने ऐश्वर्यासोबतच्या त्याच्या प्रेमसंबंधाबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे.
वास्तविक, सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायच्या आयुष्यात प्रवेश केला. त्यावेळी हे जोडपे अनेक ठिकाणी एकत्रित स्पॉट झाले होते.
मात्र एक वेळ अशी आली जेव्हा त्यांच्या या प्रेमसंबंधाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि ते वादात सापडले. विवेक ओबेरॉयने एकदा आरोप केला होता की त्याला ऐश्वर्यासोबतचे नाते तोडण्याची धमकी दिली जात आहे.
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान विवेक ओबेरॉयने त्याच्या पूर्वीच्या नात्यांबाबत मौन सोडले. विवेक म्हणाला की, कमिटमेंट केल्यानंतर निघून जाणाऱ्यांपैकी मी नाही. पण सगळ्यांनी माझी फसवणूक केली.
मुलाखतीत आपल्या जुन्या अफेअर्सबद्दल बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाला की, त्याला अनेक आश्वासने दिली होती. पण ती आश्वासने त्यांनी कधीच पूर्ण केली नाहीत.
विवेकने कोणावरही द्वेष नसल्याचं स्पष्ट केलं आणि आपल्या लग्नाला अनेक कॅज्युअल मैत्रिणींनी हजेरी लावल्याचे सांगितले.
या मुलाखतीदरम्यान विवेकने त्याच्या चित्रपट कारकिर्दीपासून व्यवसाय आणि कुटुंब अशा अनेक वैयक्तिक मुद्द्यांवर भाष्य केलं. विवेकची ही मुलाखत सोशल मीडियावर अनेकांनी पाहिली आहे.