Bollywood Kissa: सनी देओलच्या 'या' चित्रपटात जुही चावलाचा जीव थोडक्यात वाचला, जुहीनेच सांगितला किस्सा
ही कथा सनी देओल आणि जुही चावला यांच्या 'अर्जुन पंडित' या सुपरहिट चित्रपटाची आहे. जो 1999 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात दोघेही दमदार भूमिकेत दिसले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण फार कमी लोकांना माहिती आहे की, चित्रपटाच्या सीनमध्ये जुही चावलासोबत असा अपघात झाला होता की तिच्या मानेला जवळपास मोडलीच असती.
फार कमी लोकांना माहित असेल की सनी देओलच्या आधी अजय देवगणला हा चित्रपट ऑफर झाला होता. मात्र अभिनेत्याने नकार दिल्यानंतर त्यात सनीला कास्ट करण्यात आले.
त्यानंतर सनी देओलने या चित्रपटात अर्जुन पंडितची दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्या सोबत जुही चावला दिसली होती.
चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट केला जात होता. त्यावेळी जुही चावलासोबत मोठी दुर्घटना घडली. खुद्द जुहीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये एक सीन शूट करायचा होता. त्यामध्ये गुंडांपासून वाचण्यासाठी ती खंदकाच्या खाली लपली आणि या खंदकावरून ट्रेन धावत होती.
मला कल्पना नव्हती की ट्रेन त्या खंदकावरून जात आहे. त्यावेळी माझ्याकडून छोटीशी चूक झाली असती तर माझी मान कापली गेली असती आणि माझा जीव गेला असता. पण सुदैवाने मी वाचले असं जुहीने सांगितलं.
या चित्रपटात पहिल्यांदाच जुही चावला रोमँटिक भूमिकेऐवजी नकारात्मक भूमिकेत दिसली होती. जुहीची ही भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटात सनी देओलच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते.