शाहरुखच्या लेकीचा 'नो मेकअप लूक'; सौंदर्य पाहून चाहते घायाळ
Suhana Khan Pics: रविवारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान मुंबईतील वांद्रे येथे स्पॉट झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयादरम्यान सुहाना नो मेकअप लूकमध्ये दिसली. चाहते सुहानाच्या साधेपणावर घायाळ होत आहेत.
नो मेकअप लूकमध्ये दिसलेल्या सुहाना खाननं व्हाईट व्हेस्ट आणि ग्रे जॅकेटसह काळी ट्राउझर वेअर केली होती.
न्यू इयर पार्ट्यांमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसल्यानंतर सुहानाच्या चाहत्यांना तिचा नो-मेकअप लूक खूपच आवडलाय.
सुहाना आपल्या कारमध्ये बसली आहे. त्याचवेळी पॅपाराजींनी तिला कॅमेऱ्यात कैद केलं.
सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सुहानाच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा आहेत.
सुहाना खान लवकरच जोया अख्तरचा आगामी चित्रपट The Archies मध्ये दिसून येणार आहे, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.
सुहाना सध्या आपल्या लव्ह लाईफबाबत चर्चेत आहे.
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्थ नंदा आणि सुहाना एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
'The Archies' या आगामी चित्रपटात दोघेही एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.