Bollywood Records : बॉलिवूड चित्रपटांची दमदार कमाई, तरीही मोडता येणार नाही 'हे' 6 रेकॉर्ड
Bollywood Unbracable Records : बॉलिवूड चित्रपट बनवण्याची पद्धत आता काळानुसार बदलली आहे. यासोबत चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाईही वाढताना दिसत आहेत. पूर्वीपेक्षा आता चित्रपट जास्त कमाई करतात. अलिकडे आलेल्या अनेक चित्रपटांनी आधीच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. पण, असं असलं तरी काही जुन्या चित्रपटांचे रेकॉर्ड नवीन चित्रपट आणि सेलिब्रिटींना कदाचित कधी मोडता येणार नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॅक टू बॅक 17 ब्लॉकबस्टर चित्रपट - अभिनेते राजेश यांनी 1969 ते 1971 या दरम्यान 17 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. आजकाल तर काही स्टार्स एक-दोन चित्रपट हिट झाल्यावर स्वत:ला सुपरस्टार मानतात. पण, शतकातील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा रेकॉर्ड मोडणं तर दूर या जवळ पोहोचणंही आजच्या स्टार्ससाठी जवळजवळ अशक्य आहे.
एका वर्षात 2700 कोटी कमवले - जेव्हा लोक म्हणत होते की, शाहरुख खानचा हाऊन फॉल सुरु झाले, तेव्हा त्याने नवा विक्रम रचला. शाहरुख खानच्या तीन चित्रपटांनी बॅक टू बॅकने 2700 कोटींचा व्यवसाय केला आणि तोही अवघ्या एका वर्षात. पठाण, जवान आणि डंकी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.
2-4 नव्हे तर 15 कोटींचा फूटफॉल - बॉलीवूडमधील अनेक चित्रपट देखील 10 कोटींचा गल्लादेखील जमवू शकले नाहीत, पण शोलेने असा विक्रम केला जो आजपर्यंत मोडता आलेला नाही. अनेकवेळा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 15 कोटींची कमाई केली होती. आजपर्यंत कोणताही चित्रपट हा विक्रम मोडू शकलेला नाही.
सर्वाधिक एकूण कमाईचा रेकॉर्ड - आमिर खान हा एकमेव बॉलिवूड सुपरस्टार आहे, ज्याने असे तीन चित्रपट दिले आहेत ज्यांनी एकूण कलेक्शनच्या बाबतीत आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटांमध्ये धूम-3, दंगल आणि पीके यांचा समावेश आहे. पण, आता यामधील फक्त दंगल चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलेला नाही.
वर्षभरात 7 ब्लॉकबस्टर चित्रपट - एकीकडे शाहरुख खानने बॅक टू बॅक तीन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आणि 2700 कोटींचा व्यवसाय केला. धर्मेंद्र यांनीही असाच एक विक्रम केला होता. अभिनेते धर्मेंद्र यांनी 1987 मध्ये 10 चित्रपट दिले होते, त्यापैकी 7 ब्लॉकबस्टर हिट ठरले होते.
अमिताभ बच्चन-सलमान खान यांचा रेकॉर्ड : अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांच्या नावावर एक असा रेकॉर्ड आहे जो मोडणे आजच्या स्टार्ससाठी जवळजवळ अशक्य आहे. 1978 मध्ये, अमिताभ बच्चन यांनी तीन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले जे तीन सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले. त्याचप्रमाणे, सलमाननेही हाच विक्रम केला होता. 1999 साली सलमान खानने हम साथ साथ है, बीवी नंबर 1 आणि हम दिल दे चुके सनम चित्रपट सर्वाधिक कमाई करणारे ब्लॉकबस्टर चित्रपट ठरले.