PHOTO : ग्रीन आउटफइट्समध्ये बॉलिवूड बालांच्या मादक अदा, चाहते फिदा
बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांचे आउटफिट्स हा नेहमीच चर्चेत असणारा विषय. या अदाकारा नेहमीच आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करतात. अनेकदा या अभिनेत्रींचे लूकही हटके असतात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींचे क्लासी लूक सांगणार आहोत. जे तुम्हीही फॉलो करु शकता. पाहुयात ग्रीन कलरच्या आउटउफिट्समधील अभिनेत्रींचे ग्लॅमरस लूक...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या हास्यानं अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूडची धकधक गर्ल नेहमीच आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. स्टायलिश आउटफिट आणि माधुरी दीक्षित हे कधीही न तुटणारं समीकरण. या ग्रीन लेहंग्यातही माधुरीचं सौंदर्य खुलून दिसतंय.
वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल, कंगना रणौतच्या आउटफिट्स नेहमीच हटके आणि ट्रेंडी असतात. आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी जाताना कंगनानं हा आउटफिट वेअर केला होता.
करिना कपूर बॉलिवूडच्या सर्वात स्टायलिश अदाकारांपैकी एक. आपल्या ग्लॅमरस लूकनं करिना नेहमीच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. करिना या आउटफिटमध्येही सुंद दिसतेय.
अनुष्का शर्मा बऱ्याचदा ट्रेंडी आउटफिट वेअर करताना दिसून येते. तसेच अनुष्काचं ट्रेडिशनल कलेक्शनही हटके आहे. फ्लोरल प्रिंटेड साडीत अनुष्काचं सौंदर्य आणखी खुलतंय.
कियारा अडवाणी आपल्या आउटफिट्समुळे नेहमीच चर्चेत असते. या ग्रीन कलरच्या साडीतही तिचं सौंदर्य आणखी खुलून येतंय. अनुष्कानं या साडीसोबत फ्लोरल ब्लाउज मॅच केला आहे.