3 विवाहित पुरुषांवर जडला जीव, पण नशीबी आला प्रेमभंग; पन्नाशीत एकाकी आयुष्य जगतेय 'ही' अभिनेत्री!
नव्वदीत रुपेरी पडदा गाजवणारी ही अभिनेत्री केवळ एकदा नव्हे, तर तिच्या आयुष्यात तिनदा विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली होती. पण, प्रेमाच्या बाबतीत मात्र, ती कमनशिबी ठरली. प्रत्येक वेळी तिच्या प्रेमाची कहाणी अधुरीच राहिली. आणि आज वयाच्या पन्नाशीत ती, एकाकी आयुष्य जगत असल्याचं पाहायला मिळतंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App90 च्या दशकातील या अभिनेत्रीनं तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना वेड लावलं होतं. या अभिनेत्रीनं शाहरुख खानपासून ते सलमान खान आणि संजय दत्तपर्यंत अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं आणि तिचे दमदार अभिनय कौशल्यही सिद्ध केलं. मात्र, ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहिली.
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती अभिनेत्री म्हणजे, नगमा. नगमाने सलमान खानसोबत बागी-अ रिबेल फॉर लव्ह या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट 1990 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा 7वा चित्रपट ठरला. यानंतर नगमाच्या करिअरला वेग येऊ लागला. त्यानंतर त्याने यल्गार, किंग अंकल, बेवफा से वफा, पोलिस आणि मुजरिम सारखे काही मोठ्या बॅनरचे चित्रपट केले आणि खूप लोकप्रियता मिळवली.
बॉलिवूडमध्ये काही चित्रपट केल्यानंतर नगमानं तिची चांगली मैत्रीण दिव्या भारतीच्या विनंतीवरून दाक्षिणात्य सिनेसृष्टी नशीब आजमावलं. पुढे ती तामिळ आणि तेलुगु सिनेमात नंबर 1 हिरोईन बनली. साऊथमध्ये अनेक चित्रपट केल्यानंतर ती पुन्हा मुंबईत आली आणि भोजपुरी चित्रपट करू लागली. तिच्या कामासाठी आणि ग्लॅमरस अदांसाठी तिला भोजपुरी सिनेमातूनही खूप प्रशंसा मिळाली.
नगमानं बॉलिवूड, साऊथ आणि भोजपुरीसह 81 चित्रपटांमध्ये काम केलं आणि आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
मात्र, नगमा तिच्या चित्रपटांसाठीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. नगमा यांचा जन्म नंदिता अरविंद मोरारजी 1974 मध्ये मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. तिचे वडील जैसलमेरच्या राजघराण्यातील होते, जे नंतर गुजरात आणि नंतर मुंबईत स्थलांतरित झाले. कापड उद्योगातील दिग्गज म्हणून ओळखले जाणारे ते प्रसिद्ध व्यापारी होते.
काही वर्षांनंतर, नगमाचे आई आणि वडील दोघेही वेगळे झाले आणि दुसरं लग्न केलं, परंतु नगमा तिच्या 16 वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिच्या वडिलांसोबत राहिली. त्याकाळात तिनं मीडियासमोर खुलासा केला होता की, ती एवढ्या मोठ्या बिझनेस टायकूनची मुलगी आहे.
नगमा आता 49 वर्षांची असून तिचं लग्न झालेलं नाही. जरी अभिनेत्री तीनदा विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली असली तरी प्रत्येक वेळी तिच्या प्रेमाची कहाणीअधुरी राहिली आहे.
सन 2001 मध्ये नगमा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण तिनं हे नेहमीच गुपित ठेवलं होतं. सौरभ गांगुली आधीच विवाहित होता आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधारही होता. दोघांनी आंध्र प्रदेशातील एका मंदिरात गुपचूप लग्न केल्याची अफवाही पसरली होती, मात्र त्यावेळी दोघांनीही ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. सीरियस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले.
त्यावेळी सौरभ गांगुली टीम इंडियाचा कर्णधार होता. त्यावेळी जेव्हा जेव्हा भारत सामना हरला, तेव्हा लोक नगमाला ट्रोल करायचे. याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला आणि दोघांनीही ते संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर नगमानं लवकरच साऊथमधील तिच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आणि इथेच तिला तिचं पुढचं प्रेम भेटलं.
सौरव गांगुली यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नगमाचं साऊथ इंडियन अभिनेता शरथ कुमार यांच्यावर प्रेम जडलं. मात्र, तिथेही नगमा कमनशीबी ठरली आणि नातं फार काळ टिकलं नाही. दक्षिण भारतीय चित्रपटांना अलविदा केल्यानंतर नगमाने आपले निवासस्थान मुंबईत हलवले आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.