दोनदा काडीमोड, तरीसुद्धा तिसऱ्यांदा बोहल्यावर? साठीला टेकलेल्या बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट'नं स्वतःच सांगितलं...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खान आता तिसरं लग्न करतोय, अशा चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

Continues below advertisement

Aamir Khan Breaks Silence Over Third Marriage

Continues below advertisement
1/10
बॉलिवूडच्या तीन खानपैकी एक असणाऱ्या आमीर खानची यापूर्वी दोन लग्न मोडली आहेत. तरीदेखील त्याची हौस भागली नसून आता तो तिसरीच्या शोधात आहे, असं बोललं जात आहे.
2/10
दोन लग्न मोडल्याचं दुःख उरी घेऊन फिरणारा आमीर आता तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. बॉलिवूडची यंग अॅक्ट्रेस फातिमा सना शेखसोबत आमीरचं नाव जोडलं जात आहे. अशातच नुकताच आमीर रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट शोमध्ये आला होता. त्यावेळी त्यानं या चर्चांवर भाष्य केलं आहे.
3/10
रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट चॅप्टर दोनमध्ये आमीरला त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. रियानं आमीरला विचारलं की, तुम्ही पुन्हा लग्नाचा विचार करताय?
4/10
त्यावर आमीर म्हणाला की, "मी 59 वर्षांचा आहे. मला नाही वाटत मी पुन्हा लग्नाचा विचार करेन. अवघड वाटतंय मला. सध्याच्या घडीला माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत. मी पुन्हा माझ्या कुटुंबासोबत कनेक्ट झालोय. माझ्याजवळ माझी मुलं आहे. भाऊ, बहीण आहे."
5/10
पुढे बोलताना रिया चक्रवर्ती म्हणाली की, जर तुम्हाला लग्न करायचं असेल, तर वयाच्या या टप्प्यावरही तुम्ही कुणालाही तुमचा आयुष्याचा जोडीदार बनवू शकता. त्यानंतर ती म्हणाली की, मी जाहीरातही दिलीय, आमीर खानला नवरी हवीय?
Continues below advertisement
6/10
त्यावर आमीर खळखळून हसला आणि म्हणाला, आता तरी नकोय. आमीर खान म्हणाला की, "मी माझ्या जवळच्या लोकांसोबत खूश आहे. एक उत्तम व्यक्ती होण्याच्या दृष्टीनं मी काम करतोय.
7/10
बॉलिवूड अभिनेता आमीर खानची यापूर्वी दोन लग्न झाली आहेत आणि ही दोन्ही लग्न मोडली आहेत. आमीर खाननं सर्वात पहिल्यांदा 1986 मध्ये रिना दत्तसोबत आपली लग्नगाठ बांधली होती. आमीर आणि रिनाला दोन मुलं आहेत. जुनैद आणि आयरा. पण पुढे, 2002 मध्ये रिना आणि आमीर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत काडीमोड घेतला.
8/10
त्यानंतर आमीर किरण रावच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही एक मुलगा आहे, त्याचं नाव आजाद राव खान.
9/10
परंतु, चाहत्यांना धक्का देणार नाही, तर तो आमीर कसला. आपल्या चित्रपटांपासून ते अगदी पर्सनल लाईफबाबतच्या सर्वच गोष्टींमध्ये आमीरनं वेळोवेळी चाहत्यांना आश्चर्याचे धक्के दिले आहेत. तसंच, 2021 मध्ये किरण आणि आमीरनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
10/10
दरम्यान, सध्या आमीरचा एक नवा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाची अनेक चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. आमीर लवकरच सीतारे जमीन पर घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
Sponsored Links by Taboola