Ayushmann Khurrana Birthday : आरजे ते प्रसिद्ध अभिनेता... असा काहीसा आयुषमान खुराणाचा रंजक प्रवास!
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणाचा आज वाढदिवस. बॉलिवूडमधील वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी आयुषमान ओळखला जातो. (PHOTO : @ayushmannk/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनय कौशल्यानं आपल्या चित्रपटांमधून आयुषमाननं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना अगदी सहजपणे वाचा फोडली. आयुषमाननं आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. (PHOTO : @ayushmannk/IG)
आयुषमान खुराणाच्या अनेक कमी बजेटच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. (PHOTO : @ayushmannk/IG)
आयुषमान खुराणाचे वडिल प्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजर पी. खुराणा होते. आयुषमान खुराणानं आपलं शिक्षण चंढीगढमध्ये पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयुषमाननं सुरुवातीला काही काळ थिएटरमध्ये काम केलं. (PHOTO : @ayushmannk/IG)
आयुषमान खुराणानं आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. एमटीव्ही वाहिनीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'एमटीवी रोडीज'मध्ये दिसून आला होता. 'एमटीवी रोडीज'चं दुसरं सीझन जिंकल्यानंतर आयुषमाननं आरजे म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आयुषमान एमटीव्हीसह वेगवेगळ्या चॅनल्सवर टीव्ही शो होस्ट करु लागला आणि घराघरांत पोहोचला. (PHOTO : @ayushmannk/IG)
2012 वर्ष आयुषमान खुराणाच्या करिअरला खरी कलाटणी देणारं ठरलं. यावर्षी आयुषमाननं 'विकी डोनर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील अभिनयानं आयुषमाननं सर्वांच्याच मनात जागा निर्माण केली. (PHOTO : @ayushmannk/IG)
'विकी डोनर' चित्रपटासाठी आयुषमान खुराणाला बेस्ट डेब्यू अॅक्टरसाठी फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला होता. त्यासोबत आयुषमानचं 'पानी दा रंग' या गाण्याला फिल्मफेअरमध्ये बेस्ट सिंगरचं अवॉर्ड मिळालं. (PHOTO : @ayushmannk/IG)
(PHOTO : @ayushmannk/IG)