PHOTO : ‘मॉम टू बी’, आलिया भट्टने पहिल्यांदाच फ्लाँट केला बेबी बंप! पाहा फोटो...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Aug 2022 10:04 AM (IST)

1
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. आलिया आणि रणबीर कपूर यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
लग्नाच्या 2 महिन्यांनंतर प्रेग्नेंसीची घोषणा करत रणबीर आणि आलियाने सर्वांनाच हैराण केले होते.

3
दरम्यान आता आलियाने एक सुंदर फोटोशूट केले आहे, ज्यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसली आहे.
4
सुंदर चॉकलेटी रंगाच्या आउटफिटमध्ये आलिया खूप सुंदर दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज दिसत आहे.
5
आलिया आणि रणबीर कपूरचा नवा चित्रपट ब्रह्मास्त्र रिलीज होणार आहे. ही जोडी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
6
या फोटोंमध्ये आलिया भट्टचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. फोटोंमध्ये आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो : @ aliaabhatt/IG)