'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
आज आपण 2024 मध्ये रिलीज झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटांबाबत सांगणार आहोत. या यादीमध्ये बिग बजेट चित्रपटांचा समावेश आहे. हॉरर-कॉमेडीपासून अॅक्शन पॅक चित्रपटांपर्यंत अनेक चित्रपटांनी थिएटर गाजवलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजय देवगण आणि आर माधवनचा 'शैतान' हा हॉरर, थ्रीलर चित्रपट 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित झाला. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 60 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 176.05 कोटींचा गल्ला जमवला होता.
बॉक्स ऑफिसवर करीना कपूर, क्रिती सेनन आणि तबूचा 'क्रू' हा चित्रपटही हिट ठरला. या चित्रपटाची किंमत 75 कोटी असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 107.०5 कोटींचा गल्ला कमावला आहे.
शाहिद कपूर आणि कृति सेनन यांचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. या चित्रपटानं कोटींमध्ये कमाई केली. तसेच, रिलीज झाल्यानंतर तो 101.25 कोटींची कमाई करण्यात यशस्वी झाला.
शरवरी वाघ आणि अभय वर्माचा हॉरर चित्रपट 'मुंज्या' हा लहान बजेटचा चित्रपट ठरला. आदित्य सरपोतदार यांच्या चित्रपटानं घरगुती बॉक्स ऑफिसवर एकूण 120 कोटी रुपयांचा गल्ला केला.
श्रद्धा कपूर स्टारर फिल्म 'स्त्री 2' हा या वर्षाच्या सर्वाधिक प्रलंबीत चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट रिलीज झाला आणि घरगुती बॉक्स ऑफिसवर 713.15 कोटी रुपये कमाई करून ब्लॉकबस्टर बनला.
हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूरच्या 'फायटर' लाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. या चित्रपटानं एकूण 212.73 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि तो हिट ठरला.
'कल्कि 2898 एडी' या वर्षाच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटानं थिएटर आणि चित्रपटाला 500 कोटींच्या अर्थसंकल्पासह भारतात 767.25 कोटी रुपये मिळवले.
बहुचर्चित सिक्वेल चित्रपटांच्या यादीमध्ये 'भूल भुलैया 3' देखील समाविष्ट आहे. कार्तिक आर्यन स्टारर फिल्म दिवाळीवर प्रदर्शित झाली आणि एका आठवड्यातच या चित्रपटानं आपलं भांडवल वसूल केलं. चित्रपट अजूनही रुपेरी पडद्यावर आहे आणि आतापर्यंत 219.56 कोटी रुपये कमावले आहेत.
अजय देवगनच्या 'सिंघम अगेन' नं 'भूल भुलैया 3' ला पडद्यावर जोरदार टक्कर दिली. हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये आहे आणि आतापर्यंत 222.54 कोटींची कमाई केली आहे.