Best Murder Mystery Movies On OTT : डोक्याला शॉट देणारे 'हे' चित्रपट, शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सस्पेन्स, पाहा ओटीटीवर
अक्षय खन्ना, सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची भूमिका असलेला 'इत्तेफाक' हा एक अप्रतिम चित्रपट होता. यश चोप्रा यांच्या 'इत्तेफाक' या चित्रपटाचा वेगळ्या धाटणीचा रिमेक तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. दमदार अभिनय, पटकथा यामुळे चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयुष्मान खुराना आणि तब्बू यांचा चित्रपट 'अंधाधुन' एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. हा चित्रपट YouTube वर रेंटवर किंवा Apple टीव्हीवर पाहता येईल.
देशभरात गाजलेल्या आरुषी मर्डर केसवर 'तलवार' हा चित्रपट आधारीत आहे.या चित्रपटात अचानकपणे नवीन वळणे येत असतात. आरुषी हत्या तपासात नेमकं काय घडलं असावं, यावर हा चित्रपट भाष्य करतो. 'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर तुम्ही हा चित्रपट विनामूल्य पाहू शकता.
'रात अकेली है' या चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते. सस्पेन्स, थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात डार्क कॉमेडी पाहायला मिळेल. चित्रपटातील काही घटना तुम्हाला आश्चर्यचकित करतात. अचानकपणे येणारे वळण, नवीन ट्वीस्ट यामुळे हा चित्रपट अखेरपर्यंत खिळवण्यास यशस्वी ठरतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
'मर्डर मुबारक' हा मल्टीस्टारर चित्रपट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये एका हत्येचे गूढ उकलले आहे. पण चित्रपट हा फारसा गंभीर न बनवता त्यात कॉमेडीचा तडाका जास्त ठेवण्यात आला आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येईल.
करीना कपूर, जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांची भूमिका असलेला थ्रिलर चित्रपट 'जाने जान' याची चर्चा चांगलीच रंगली होती. तगडी स्टारकास्ट आणि त्याला साजेशी मजबूत पटकथा यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटात एक सायकोलॉजिकल कथा दाखवण्यात आली आहे. परिणीती चोप्राची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.