Beach Clean : 'आपण केलेला कचरा आपल्यालाच साफ करावा लागणार' म्हणत Bhoomi Pednekar ने केला समुद्रकिनारा स्वच्छ
मंबईतील समुद्रकिनारा स्वच्छ करत असताना भूमी पेडणेकरने पर्यावरण संवर्धन करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भूमीने क्लाइमेट वॉरिअर लिहिलेला पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंबईतल्या कार्टर रोडवर असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर भूमीने जवळजवळ अर्धा तास पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संघटनेतील सदस्यांसह साफसफाई केली.
'भामला फाउंडेशन'ने या स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. दरम्यान भूमी म्हणाली,आपण केलेला कचरा आपल्यालाच साफ करावा लागणार आहे.
भूमी म्हणाली,पुढच्या पिढीचा विचार करुन आपल्याला वेळीच पर्यावरणाचे संवर्धन करायला हवे.
तुम्ही जर तुमच्या कुटुंबावर प्रेम करत असाल तर तुम्ही पर्यावरणावरदेखील प्रेम केले पाहिजे, असे भूमी पेडणेकर स्वच्छता अभियाना दरम्यान म्हणाली.
भूमीने त्या स्वच्छता अभियानात 3.5 टन कचरा गोळा केला. त्यामुळेच भूमी म्हणाली,कचऱ्याचे योग्य पद्धतीने विघटन केले पाहिजे.