PHOTO : बॅकग्राउंड डान्सर ते लोकप्रिय अभिनेत्री! ‘असा’ होता ‘सिंघम’ फेम काजल अग्रवालचा फिल्मी प्रवास...
साऊथपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आज (19 जून) आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड चित्रपटातून केली होती. मात्र, साऊथ इंडस्ट्रीने तिला खरी ओळख मिळवून दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीने मास मीडिया विषयामध्ये पदवी मिळवली आहे. काजलला बालपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. यामुळे तिने ‘बॅकग्राउंड डान्सर’ म्हणून करिअरला सुरुवात केली होती.
काजल अग्रवालने 2004 मध्ये ‘क्यूं हो गया ना’ या बॉलिवूड चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या चित्रपटात काजलने ऐश्वर्या रायच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर काजल तमिळ दिग्दर्शक भारतीराजाच्या ‘बोमलट्टम’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन सर्जा आणि नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.
बॉलिवूडमध्ये फारशी ओळख मिळत नसल्याचे पाहून काजलने तामिळ फिल्म इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला. तिने 2007मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’मध्ये अभिनेता कल्याण रामसोबत तेलगूमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी जादू शकला नाही. त्यानंतर ती त्याचवर्षी ‘चंदामामा’मध्ये दिसली.
हा चित्रपट काजलचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला होता. यानंतर, 2009 मध्ये रिलीज झालेल्या एसएस राजामौली यांच्या ‘मगधीरा’ या ऐतिहासिक चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसली. या चित्रपटामुळे संपूर्ण इंडस्ट्रीने काजलच्या अभिनयाची दाखल घेतली.
साऊथमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर काजलने 2011मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. तिला अजय देवगणसोबत ‘सिंघम’ चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ चित्रपटामध्ये काजल अग्रवाल आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. (Photo : @ kajalaggarwalofficial/IG)