आयुष्मान खुरानाची UNICEF इंडियाच्या नॅशनल ब्रँड अॅम्बेसिडरपदी नियुक्ती!
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुनिसेफ इंडियाच्या वतीने आयुष्मानची राष्ट्रीय सदिष्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याने अनेक गरजू मुलांची मदत करण्यासाठी युनिसेफशी हातमिळवणी केली आहे.
सदिष्छा दूतपदी नियुक्ती झाल्यानंतर आयुष्मान खुराना म्हणाला,युनिसेफ इंडियाच्या माध्यमातून अनेक गरजू मुलांच्या हक्कांसाठी मला प्रयत्न करता येणार आहेत.
आयुष्मान खुरानाची आता युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी नियुक्ती झाली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून तो या संस्थेशी जोडला गेला आहे.
लहान मुलांवरील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी आणि बालहक्कांसाठी आयुष्मानने युनिसेफ इंडियाचा सेलिब्रिटी वकील म्हणून काम केलं आहे.
'जागतिक बाल दिन', 'आंतरराष्ट्रीय महिला दिन', आंतरराष्ट्रीय बालिका दिन' या खास दिवशी आयुष्मान युनिसेफ इंडियाच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झाला आहे.
युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी नियुक्ती झाल्यानंतर आयुष्मानने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
आयुष्मानने लिहिलं आहे,राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी नियुक्ती केल्याबद्दल युनिसेफ इंडियाचे आभार...मी गेल्या दोन वर्षांपासून युनिसेफशी जोडला गेलो आहे.
आयुष्मानने पुढे लिहिलं आहे,आता देशातील प्रत्येत मुलाच्या हक्कांसाठी मी प्रयत्न करणार आहे.