Athiya Shetty: अथियाचा लग्नातील लेहंगा बनवण्यासठी लागले तब्बल 10,000 तास, कोण आहे डिझायनर? जाणून घ्या
भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी काल खंडाळा येथे लग्नगाठ बांधली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी लग्न केलं आहे.
लग्नसोहळ्यासाठी अथिया आणि केएल राहुल यांनी रॉयल लूक केला होता.
अथियानं हाताने विणलेला रेशीमचा लेहंगा आणि सिल्क ऑर्गन्झाचा दुपट्टा असा रॉयल लूक केला होते.
अथियाचा हा लेहंगा अनामिका खन्ना यांनी डिझाइन केला होता.
वोगला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनामिका खन्नानं सांगितलं की, हा लेहंगा तयार करायला तिला 10,000 तास लागले.
स्टोनचा चोकर नेकलेस, बिंदी, झुमके, बांगड्या हे दागिने देखील अथियानं लग्न सोहळ्यात परिधान केले होते.
विवाह सोहळ्यातील अथियाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. अथियाच्या या लूकचं अनेकांनी कौतुक केलं.
अथिया आणि केएल राहुल 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.