PHOTO : कतरिना कैफ व्यतिरिक्त सलमान खान 'या' अभिनेत्रींना इन्स्टाग्रामवर करतो फॉलो!
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणजेच सलमान खान आजकाल त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नव्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी तो सज्ज आहे. इंस्टाग्रामवर सलमान खानला 51 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर सलमान खान त्याच्या पोस्ट्समुळे चर्चेत असतो. त्याच्या फार्महाऊसमधील त्याचे व्हिडीओ किंवा कधीकधी त्याचे वर्कआउट फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
सलमान खानला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात. मात्र, सलमान इंस्टाग्रामवर एकूण 34 लोकांना फॉलो करतो आणि या यादीत फक्त सात अभिनेत्री आहेत.
त्यापैकी एक म्हणजे कतरिना कैफ. कतरिना आणि सलमान, यांनी ‘भारत’ आणि ‘टायगर जिंदा है’ व्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले आहे. एकेकाळी दोघेही एकमेकांना डेट करायचे.
या नावांव्यतिरिक्त, सलमान त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देखील फॉलो करतो, ज्यात भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान, बहिणी अर्पिता खान शर्मा आणि अलविरा अग्निहोत्री, तसेच मेहुणा अतुल अग्निहोत्री यांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त सलमान खान इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर कतरिना कैफ, संगीता बिजलानी, डेझी शाह, वालुशा डीसुझा, जॅकलीन फर्नांडिस, युलिया वंतूर आणि इसाबेल कैफ यांना फॉलो करतो.