PHOTO : तुम हुस्न परी तुम जान-ए-जहां.... माधुरी दीक्षितच्या साडी लूकवर चाहते फिदा!
बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितचे चाहते आज जगभरात उपस्थित आहेत, जे तिच्या एका झलकची वाट पाहत असतात. माधुरी कुठेही गेली, तरी तिला पाहण्यासाठी हजारो लोक जमतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीची स्टाईल आजही चाहत्यांमध्ये ट्रेंड बनते. माधुरीही तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्यासाठी प्रयत्न करते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये तिने सुंदर पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.
या साडीसोबत तिने निळ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी असलेला स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी केला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री बाल्कनीत उभी राहून सुंदर फोटो पोज देत आहे.
हा साडी लूक पूर्ण करण्यासाठी माधुरीने हलका मेकअप केला आहे आणि केसांचा आंबाडा बांधला आहे. सोबतच तिने सोनेरी आणि पांढर्या स्टोनचे कानातले घातले आहेत. तसेच, माधुरीने हातात सोनेरी बांगड्या घातल्या आहेत.
या साध्या लूकमध्येही ती खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनाही आता तिच्या या स्टाईलवरून नजर हटवता येत नाहीय. (Photo : @MadhuriDixit/ Twitter)