Anushka Sharma And Virat Kohli: विरुष्काच्या लग्नाच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; पाहा फोटो
क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुष्का आणि विराटनं नुकतेच सोशल मीडियावर त्यांच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
अनुष्कानं तिच्या आणि विराटच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
विरुष्कानं त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी खास लूक केला होता. अनुष्कानं ब्लॅक आऊटफिट आणि मोकळे केस असा लूक केला होता. तर विराटनं ब्लू शर्ट आणि ब्लॅक पँट असा लूक केला होता.
अनुष्कानं लग्नाच्या वाढदिवसाचा एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, प्रेमाने भरलेला दिवस... इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करायला थोडा उशीर झाला.
अनुष्का आणि विराट यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला त्यांच्या मित्रमैत्रीणींनी हजेरी लावली होती.
अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का हे केक कट करताना दिसत आहेत.
अनुष्कानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2018 मध्ये इटलीमध्ये लग्नगाठ बांधली.जानेवारी 2021 मध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला. तिचे नाव वामिका (Vamika Kohli) असं आहे.