Bharat Jodo Yatra: ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, संध्या गोखले भारत जोडो यात्रेत सहभागी; पाहा फोटो
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी नुकताच भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.

Amol Palekar,Bharat Jodo Yatra ,rahul gandhi
1/8
भारत जोडो यात्रेमध्ये अनेक सेलिब्रिटी सध्या सहभागी होत आहेत. (Bharat Jodo/twitter)
2/8
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नुकताच भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.(Gaurav Pandhi/twitter)
3/8
अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर आपल्या पत्नीसह भारत जोडो यात्रेमध्ये सामील झाले. (Jairam Ramesh/twitter)
4/8
काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन अमोल पालेकर, संध्या गोखले आणि राहुल गांधी यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. (Gaurav Pandhi/twitter)
5/8
काँग्रेसनं ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'देशाचा आवाज बुलंद केल्याबद्दल धन्यवाद.' (Bharat Jodo/twitter)
6/8
'देशाप्रती आपली जबाबदारी ओळखून आज प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर आपल्या पत्नीसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.' असंही काँग्रेसनं अमोल पालकर यांचे भारत जोडो यात्रेतेमधील फोटो शेअर करुन लिहिले. (Bharat Jodo/twitter)
7/8
अमोल पालेकर हे 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांना 'गोल माल' आणि 'नरम गरम' यांसारख्या चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली. (Gaurav Pandhi/twitter)
8/8
रश्मि देसाई आणि आकांक्षा पुरी यांनी देखील भारत जोडोमध्ये सहभाग घेतला. (Bharat Jodo/ twitter)
Published at : 20 Nov 2022 11:39 AM (IST)