बिग बींच्या आगामी चित्रपटांची यादी, वयाच्या 82 व्या वर्षी एंग्री यंग मॅन बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज
Bollywood Actor Amitabh Bachchan Upcoming Movies: बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन मेगास्टार अमिताभ बच्चन 82 वर्षांचे झाले आहेत आणि अजुनही ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी येत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बी तासंनतास शूटिंग सेटवर व्यस्त असतात. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपच लाईनमध्ये आहेत. या चित्रपटांची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. पाहुयात येत्या काही दिवसांत अमिताभ बच्चन यांचे कोणते चित्रपट येणार आहेत...?
आँख मिचौली 2: अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांच्या यादीतील पहिलं नाव, 'आँख मिचोली 2'. या चित्रपटात तो सिक्कूची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि अहवालांवर विश्वास ठेवला, तर पुढचा भाग 2025 मध्ये येऊ शकतो.
ब्रह्मास्त्र 2 (Brahmastra 2) : लॉकडाऊननंतर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटानं थिएटरमध्ये पुन्हा उत्साह आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या चित्रपटात अमिताभ बच्चन गुरू अरविंद यांची भूमिका साकारताना दिसले होते. आता चाहते ब्रम्हास्त्रच्या भाग-2 ची वाट पाहत आहेत, ज्यात अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेची भूतकाळातील गोष्ट दाखवली जाऊ शकते.
कल्कि 2898 AD - भाग 2 : कल्की 2898 AD ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि अश्वत्थामाच्या भूमिकेतील अमिताभ बच्चन यांना प्रेक्षकांनी पसंती दिली. आता चाहते नाग अश्विन चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येण्याची वाट पाहत आहेत, ज्यात अमिताभ बच्चन पुन्हा एकदा जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहेत.
सेक्शन 84: अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांमध्येही 'सेक्शन 84'चा समावेश आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बॅनर्जी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. चित्रपटाची कथा आणि इतर गोष्टींबाबत अद्याप अनेक गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे.
आँखे 2 : अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांमध्ये 'आँखे 2' हे नावही चर्चेत आहे. या चित्रपटाचा भाग-1 सुपरहिट झाला होता, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशी माहिती मिळतेय की, निर्माते या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचा विचार करत आहेत.
तेरा यार हूं मैं : अमिताभ बच्चन यांचा 'तेरा यार हूं मैं' हा चित्रपटही सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टपासून कलाकारांपर्यंत अनेक गोष्टींची सध्या चर्चा सुरू आहे, मात्र हा अमिताभ यांचा सर्वात खास चित्रपट असल्याचं बोललं जात आहे.