Pandharpur : कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला; आजपासून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर 24 तास राहणार खुलं, देवाचा थकवा दूर करण्यासाठी मागे मऊ कापसाचा लोड
कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठ्ठलाचं दर्शव 24 तास सुरू असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा आहे, या पार्श्वभूमीवर देवाचा पलंग निघाला आहे.
देवाचा थकवा दूर करण्यासाठी पाठीमागे मऊ कापसाचा लोड लावण्यात आला आहे.
आजपासून विठुरायाचं दर्शन 24 तास सुरू राहणार आहे.
कार्तिक यात्रेला येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शनी मिळावे यासाठी 24 तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
आजपासून देवाचे नित्योपचार वगळता राजोपचार बंद केले जाणार आहेत.
24 तास दर्शन देऊन विठ्ठलाला थकवा येऊ नये म्हणून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पाठीशी लोड लावला आहे.
या काळात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला दररोज दुपारी लिंबू पाण्याचा देखील नैवेद्य दिला जातो.
विठूरायाचं दर्शन घेता आलं नाही म्हणून हिरमुसलेले अनेक चेहरे पाहायला मिळतात. मात्र कार्तिकी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठूराया आपल्या लाखो भक्तांना भेटण्यासाठी सदैव तत्पर असतो. त्यामुळे देवाचा विश्रांती घ्यायचा पलंग काढला जातो. ज्याला देवाचा पलंग काढणे असं म्हणतात.
देवाचा पलंग एकदा काढला की पंढरपूर इथं विठ्ठलाचं दर्शन या लाखो वारकऱ्यांना घेणं शक्य होतं.