Gangunai Kathiawadi Promotion : कानात झुमका, डोळ्यांत अदा; आलियाच्या खास लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा
आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या आपला आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीचं (Gangubai Kathiawadi) प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. (@aliaabhatt/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहे. (@aliaabhatt/Instagram)
प्रमोशनसाठी आलिया हटके फॅशन ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. आलिया वेगवेगळ्या अंदाजात चित्रपटाचं प्रमोशन करतेय. त्यासाठी ती पांढऱ्या रंगाच्या साड्या वेअर करताना दिसतेय. (@aliaabhatt/Instagram)
आलिया भट्ट प्रमोशनदरम्यान पांढऱ्या रंगाच्या साड्या वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये वेअर करताना दिसत आहे. गंगूबाई काठियावाडीमध्ये तिनं पांढऱ्या रंगाच्याच साड्या परिधान केल्या आहेत. (@aliaabhatt/Instagram)
आता आलियाचा आणखी एक नवा वूक समोर आला आहे. प्रमोशनसाठी आलियानं पांढऱ्या रंगाची साडी ब्लॅक ब्लाउजसह वेअर केली आहे. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. त्यासोबतच तिनं केसांची वेणी बांधली आहे. तर कानामध्ये झुमके वेअर केले आहेत. (@aliaabhatt/Instagram)
आलियानं आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना आलियानं एक कॅप्शनही दिलंय. (@aliaabhatt/Instagram)
लव्ह द साडी, असं म्हणत आलियानं आपले फोटो शेअर केले आहेत. (@aliaabhatt/Instagram)
फोटोंमध्ये आलिया हटके पोझ देताना दिसत आहे. तिचा हा लूक सर्वांनाच आवडला असून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (@aliaabhatt/Instagram)
गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेका अजय देवगण (Ajay Devgn) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (@aliaabhatt/Instagram)