Alia Bhatt And Ranveer Singh: रॉकी आणि राणीचा रोमँटिक अंदाज; करण जोहरनं शेअर केले आलिया आणि रणवीरच्या लूक टेस्टचे फोटो
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामधील 'तुम क्या मिले' (Tum Kya Mile) हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच करण जोहरनं आलिया आणि रणवीरनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या लूक टेस्टसाठी काढलेले फोटो शेअर केले आहेत.
आलिया आणि रणवीरचा हा फोटो शेअर करुन करणनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमच्या चित्रपटाची पहिली लूक टेस्ट, जेव्हा आम्ही रॉकी आणि राणीला शोधत होतो.'
करणनं शेअर केलेल्या फोटोमधील आलिया आणि रणवीच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आलिया आणि रणवीरचे आणखी काही फोटो शेअर करुन करणनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'रॉकी आणि राणीचे आणखी काही फोटो, ट्रेलर लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे. '
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.