Akshaya Hardeek Wedding : नऊवारी साडी, हिरवा चुडा, साजश्रृंगार...पाठकबाईंचा नववधू साज पाहिलात का?
पाठकबाईंचा म्हणजेच अक्षया देवधरचा नववधू लूक समोर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षया देवधरने लग्नात लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
नऊवारी साडी, हिरवा चुडा आणि साजश्रृंगार असा अक्षया देवधरचा नववधू साज आहे.
नववधूच्या लूकमध्ये अक्षया खूपच सुंदर दिसत आहे.
अक्षयाने तिच्या नेलआर्टमध्ये तिच्या लग्नाची तारीख आणि त्या दोघांचे नावाचे पहिले अक्षर म्हणजेच 'अहा' असे लिहले आहे.
अक्षयाची मेहंदीदेखील आकर्षक आहे. तिने मेहंदीत सप्तपदीची डिझाइन काढली आहे.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडणार आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून अक्षया आणि हार्दिक प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
प्रेक्षकांच्या पसंतीची ऑनस्क्रिन जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याने चाहते मात्र आनंदी झाले आहेत.
नववधूच्या लूकमध्ये अक्षया आनंदी दिसत आहे.