Aishwarya-Abhishek Love Story: चित्रपटाच्या सेटवर पडले प्रेमात; बाल्कनीत केले प्रपोज; अशी आहे ऐश्वर्या आणि अभिषेकची प्यारवाली लव्हस्टोरी
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा आज 50 वा वाढदिवस आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रेमकहाणीबद्दल अनेकांनी माहित नसेल. जाणून घेऊयात त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐश्वर्या आणि अभिषेक यांची ओळख 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ढाई अक्षर प्रेम या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर झाली. नंतर या दोघांमध्ये मैत्री झाली.
दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
ढाई अक्षर प्रेम के चित्रपटानंतर ऐश्वर्याने 2003 मध्ये रिलीज झालेल्या कुछ ना कहो या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत काम केले होते. यानंतर दोघेही 2006 मध्ये उमराव जान चित्रपटात देखील एकत्र दिसले होते. येथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी धूम 2 या चित्रपटात देखील ये एकत्र काम केले. तेव्हा त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
अभिषेकने ओप्रा विन्फ्रेच्या शोमध्ये खुलासा केला होता की, न्यूयॉर्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो एका हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहायचा आणि ऐश्वर्याशी लग्न करण्याबद्दल विचार करायचा. पुढे अभिषेक हा ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत घेऊन गेला आणि तिला लग्नासाठी प्रपोज केले.
4 जानेवारी 2007 रोजी ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न झाले आणि 20 एप्रिल 2007 रोजी लग्न झाले.
2011 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक आई-बाबा झाले. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव अराध्या असं ठेवले.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.