PHOTO : 'या' कलाकारांच्या निधनानंतर प्रदर्शित झाले त्यांचे अखेरचे चित्रपट!
ऋषी कपूर : अभिनेता ऋषी कपूर यांचं 2020 मध्ये निधन झालं. त्यावेळी ते 'शर्मा जी नमकीन' हा चित्रपट करत होते. त्यांच्या निधनानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नंतर हा चित्रपट परेश रावल यांनी पूर्ण केला. पण असे आणखी कलाकार आहेत ज्यांचं अचानक निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. (फोटो - सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिव्या भारती : अभिनेत्री दिव्या भारती जिवंत असताना सुपरस्टार होती पण अचानक अपघातात तिचा मृत्यू झाला. बाल्कनीमधून पडून दिव्या भारती मृत्युमुखी पडली. त्यावेळी ती अनेक चित्रपटांचं शूटिंग करत होती. ज्या चित्रपटांचं शूटिंग सुरु झालं होतं त्यामध्ये दुसऱ्या अभिनेत्रीला घेतलं तर रंग आणि शतरंज या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण झालं होतं, जे तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित करण्यात आले (फोटो - सोशल मीडिया)
श्रीदेवी : आपल्या काळातली सुपरस्टाक श्रीदेवीचा अकस्मात मृत्यू झाला. निधनाच्या आधी तिने झीरो चित्रपटात कॅमियो केला होता. जो तिच्या निधनाच्या दहा महिन्यांनी प्रदर्शित झाला होता. (फोटो - सोशल मीडिया
सुशांत सिंह राजपूत : सुशांत सिंह राजपूतने 2020 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर त्याचा शेवटचा 'दिल बेचारा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या हा चित्रपटला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. (फोटो - सोशल मीडिया)
ओम पुरी - ओम पुरी यांचं निधन झालं त्यावेळी त्यांनी अनेक चित्रपटांचं शूटिंग केलं होतं. हे सर्व चित्रपट त्यांच्या निधनानंतरच प्रदर्शित झाले होते. यामध्ये ट्यूबलाईट, मिस्टर कबाड़ी, गुल मकई, टायगर, द गाजी अटॅक यांचा समावेश आहे (फोटो - सोशल मीडिया)
राजेश खन्ना : पहिले सुपरस्टार अशी बिरुदावली मिरवणारे अभिनेते राजेश खन्ना यांनी 2012 मध्ये जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या निधनानंतर 2014 मध्ये 'रियासत' या चित्रपट प्रदर्शित झाला होता. (फोटो - सोशल मीडिया)
शम्मी कपूर : 2011 मध्ये शम्मी कपूर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर 'रॉकस्टार' हा चित्रपट रिलीज झाला.