PHOTO : सलमानच्या प्रेमात वेडी झालेली सोमी 16व्या वर्षी भारतात आली होती! अभिनेत्रीबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
बॉलिवूडमध्ये सलमान खानमुळेच सोमी अलीचा नेहमी उल्लेख होतो. जेव्हाही सलमान खानच्या गर्लफ्रेंडचा विषय निघतो, तेव्हा सोमी अलीचे नाव नक्कीच घेतले जाते. पण, यावेळी सोमी अली तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिने एक फोटो शेअर करून, पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला माहीत नसेल, सोमी अली कोण आहे? सलमान खानशी तिचे काय नाते आहे आणि तिने अशी पोस्ट का केली असावी, तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे.
सोमी अली ही मुळची पाकिस्तानी असून, तिची आई इराकची तर वडील पाकिस्तानचे आहेत. त्यामुळे तिचे संपूर्ण बालपण पाकिस्तानात गेले. पण, नंतर ती तिच्या आईसोबत अमेरिकेत फ्लोरिडा येथे शिफ्ट झाली.
सोमी अलीला लहानपणापासूनच बॉलिवूडचे आणि विशेषतः सलमान खानचे खूप आकर्षण होते, त्यामुळे वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने मुंबईगाठली होती. ती मायानगरीत आली आणि इथे तिची भेट सलमान खानशी झाली.
सोमी अलीचा सलमान खानसोबतचा ‘बुलंद’ हा पहिला चित्रपट होता, पण काही कारणास्तव तो प्रदर्शित झाला नाही. हळूहळू सोमी आणि सलमानची जवळीक वाढत गेली आणि लवकरच त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या. सलमानने हे नाते मान्य केले नसले, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांनी एकमेकांना तब्बल 6 वर्षे डेट केले होते.
त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या ब्रेकअपची अनेक कारणे सांगितली गेली. सलमान खानच्या वागण्यामुळे सोमी त्याच्यापासून विभक्त झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात होते, तर सोमी अलीला सलमानने फसवले होते, त्यामुळे ती वेगळी झाली असेही म्हटले जात होते.
बॉलिवूडच्या 6 वर्षाच्या कारकिर्दीत सोमी अलीचे एकूण 8 चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये ‘अंत’, ‘कृष्ण अवतार’, ‘यार गद्दार’, ‘तीसरा कौन’, ‘आओ प्यार करें’, ‘आंदोलन’, ‘माफिया’ आणि ‘चुप’ या चित्रपटांचा समावेश होता. पण यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करू शकला नाही.
एकीकडे हृदय तुटले आणि दुसरीकडे करिअरमध्येही काही विशेष करता आले नाही, म्हणून तिने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती अमेरिकेत परतली. सोमी अली सध्या मियामीमध्ये राहते. सोमी अलीने अभिनय सोडला असून, ती ‘नो मोअर टियर्स’ नावाचा एनजीओ चालवते. या अंतर्गत ती कौटुंबिक हिंसाचाराला आळा घालण्याचे काम करत आहे. (Photo : @realsomyali/IG)