मोनोकिनीनंतर जान्हवी कपूरचा पारंपरीक अवतार; पहा फोटो
यापूर्वी मालदीवमध्ये श्रीदेवीची लाडकी जान्हवी कपूरचा अवतार पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. जान्हवी कपूरने मोनोकिनीमध्ये फोटो शेअर करुन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिच अभिनेत्री आता मोनोकिनीमधून थेट लेहेंगामध्ये दिसली आहे. जान्हवी कपूरने अलीकडेच इंस्टाग्रामवर लेहेंगामधील छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
या डिझायनर लेहेंगामध्ये ती वधू असल्यासारखी दिसत आहे. हे फोटो शेअर करताना जान्हवी लिहलंय की 'आज जाने की जिद्द न करो'. (फोटो - इंस्टाग्राम)
जान्हवी पहिल्यांदाच या अवतारात आलेली नाही. तर यापूर्वीही तिचा हा पारंपरिक अवतार पहायला मिळाला आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
यापूर्वी जान्हवी डिझायनर मनीष मल्होत्राच्या लेहंगामध्येही दिसली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर वधू दिसत होती. (फोटो - इंस्टाग्राम)
काळी दिवसांपासून तिच्या बोल्ड लूकची चर्चा असली तरी जान्हवीला भारतीय आणि पारंपरिक पोशाख परिधान करणे खूप आवडते. हे या फोटोंवरुन सिद्ध झाले आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
विशेषत: साडीमध्ये जान्हवी हुबेहूब आई श्रीदेवीची झलक दिसते. (फोटो - इंस्टाग्राम)