रिया चक्रवर्तीला बॉलिवूडमध्ये काम मिळेना; चित्रपटांसाठी हैदराबादकडे मोर्चा
संपादित छायाचित्र
1/9
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती हिने सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झाला होता. यानंतर रियाला अनेक वादांना सामोरे जावे लागले. यासंदर्भात अंमली पदार्थांच्या एका प्रकरणात तिला तुरूंगातही जावे लागले. सध्या रिया जामीनावर बाहेर आहे. मात्र, संकटांनी तिचा पिछा अजूनही सोडलेला नाही. बॉलिवूडमध्ये काम नसल्यामुळे रिया हल्ली हैदराबादमध्ये कामाच्या शोधात आहे. पूर्वीसारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न ती करत आहे.
2/9
बातम्यांनुसार रिया लवकरच एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. पण, रियाने अद्याप या बातमीला दुजोरा दिला नाही. त्याचबरोबर सूत्रांचे म्हणणे आहे की, रियासाठी हे सोपे काम नाही. मात्र, पुढे जाण्यासाठी आणि पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी तिला हे करण्याची आवश्यकता आहे.
3/9
रिया हळूहळू तिच्या सामाजिक जीवनातही परत येत आहे. अलीकडेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिच्या हातात हनुमान चालीसा पहायला मिळाली. हा फोटो शेअर करताना रियाने लिहिले की, आम्हाला या वादळाशी लढण्याची शक्ती द्या, या दु: खाचा सामना करण्याची शक्ती द्या. जय बजरंगबली.
4/9
यापूर्वी रियाने स्वत: चा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती पुस्तक वाचत असताना दिसत आहे. या फोटोसोबत विश्वास ढळू देऊ नका, असं लिहलंय.
5/9
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे गेले कित्येक दिवस रिया चक्रवर्तीचे घराबाहेर पडणेही अवघड झाले होते.
6/9
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रियाची सीबीआयनेही चौकशी केली आहे.
7/9
मात्र, सीबीआयच्या चौकशीनंतरही तपासातून काहीच समोर आलं नाही.
8/9
या प्रकरणानंतर रियाला सध्या बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याच्या बातम्या आहेत.
9/9
सर्व फोटो रिया चक्रवर्तीच्या सोशल मीडियावरुन साभार
Published at : 28 Apr 2021 05:41 PM (IST)