Ott Release : हा आठवडा ओटीटी प्रेमींसाठी असणार खास, जाणून घ्या कोणते सिनेमे आणि वेबसीरिज येणार भेटीला

हा आठवडा ओटीटी प्रेमींसाठी खूपच धमाकेदार असणार आहे. या आठवड्यात खूप चांगले चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Muppets Haunted Mansion - Disney + Hotstar - हा अमेरिकेतील एक विनोदी कार्यक्रम आहे. त्यातील गोंजो हॉन्टेड मिशनमध्ये एक रात्र घालवण्याचे चॅलेंज घेतो. हा शो 8 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Csi Vegas - Voot Select - आपल्याकडे असलेल्या ज्ञानातून रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गटावर आधारित ही वेब सीरिज असणार आहे. ही वेब सीरिज 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
House Of Secrets : The Burari Deaths - दिल्लीतील 11 जणांच्या कुंटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू होते. त्या मृत्यूमागचे खरे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न या लघुपटाने केला आहे. हा लघुपट 8 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
Bhraman Amazon Prime - ब्लॅक विनोदी, थ्रिलर असा हा प्राइम व्हिडीओ असणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन, उन्नी मुकुंदन, ममता मोहनदास, राशी खन्ना आणि शंकर पनिकर यात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.
Baking Impossible - Netflix - बेकिंग इम्पॉसिबल ही सीरिज इनोवेटिव्ह बेकर्स आणि इंजीनिअरवर आधारित सीरिज आहे. जे नेहमी काहीतरी भन्नाट कलाकृती बनविण्याचा प्रयत्न करतात.
Among Then Stars - Disney + Hotstar - ही नासाच्या जगात घेऊन जाणारी सहा भागांची मालिका आहे. कॅप्टन क्रिस कैसिडी या अंतरिक्षाच्या प्रवासासोबत ही वेबसीरिज सुरू होते. ही वेब सीरिज 6 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.