PHOTO: लग्नाबाबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली..
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) वेगवेगळ्या विषयांवर तिची मत सोशल मीडियावर मांडत असते.(photo:taapsee/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या चित्रापटामधील अभिनयाला प्रेक्षकाांची पसंती मिळते. रिपोर्टनुसार, डेनमार्कचा (Denmark) बॅडमिंटनपटू 'मॅथियास बो'ला तापसी डेट करत आहे.(photo:taapsee/ig)
अनेक वेळा या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तापसीनं तिच्या लग्नाबाबत सांगितलं.(photo:taapsee/ig)
तापसी म्हणाली, 'मला नेहमीच असं वाटत होतं की बॉलिवूड इंडस्ट्री बाहेरचा मुलगा मला मिळावा. करिअरच्या सुरूवातीलाच मला ती व्यक्ती मिळाली. ज्याच्यासोबत राहून मला आनंद व्हायचा. आमच्या दोघांचे स्वभाव वेगळे आहेत. आमची संस्कृती देखील वेगळी आहे, ही गोष्ट खूप चांगली आहे. जेव्हा मी काही नववधुंना पाहते तेव्हा मला दिसते की, मेक-अपचा मोठा थर त्यांनी लावलेला आहे. पण नंतर जेव्हा मी त्या नववधुंना पाहते तेव्हा मला दिसते की, त्या खूप वेगळ्या दिसत आहेत. मला खूप बेसिक पद्धतीनं आणि ड्रामा फ्री पद्धतीनं लग्न करायचे आहे. कारण माझ्या प्रोफेशनल लाइफमध्ये देखील ड्रामा सुरू असतो. त्यामुळे मला पर्सनल लाइफमध्ये देखील ड्रामा नकोय. '(photo:taapsee/ig)
तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(photo:taapsee/ig)
त्यानंतर तिच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.(photo:taapsee/ig)
तापसीचा ब्लर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे.(photo:taapsee/ig)