PHOTO | मलायका अरोराच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा; किंमत ऐकून व्हाल अवाक्
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखली जाते. अशातच नुकतीच मलायका अरोरा एका पार्टीसाठी गेली होती. त्यादरम्यानच्या मलायकाच्या लूकच्या सध्या सर्वत्र रंगल्या आहेत. मलायकाने वेअर केलेला ड्रेस क्लासी होताच, पण तो महागडाही होता. तिच्या ड्रेसची किंमत ऐकून नेटकरीही हैराण झाले आहेत. तिच्या लूकमुळे सध्या ती सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्येही आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमलायका आपली बहिण अमृता अरोराकडे हाऊस पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी मलायकाने हाय हिल्ससोबत satin co-ord सेट वेअर केला होता.
यावेळी मलायकाने हाय हिल्ससोबत satin co-ord सेट वेअर केला होता. तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
मलायकाने जो ड्रेस वेअर केला होता, तो Gucci ब्रँडचा होता. या सेटची किंमत जवळपास 1.5 लाख रुपये आहे.
मलायकाने चेरी कलरचं जर्सी जॅकेटही वेअर केलं होतं, ज्याची किंमत 94,497 रुपये आहे आणि शॉर्ट्सची किंमत जवळपास 55,840 रुपये आहे. या ड्रेसची एकूण किंमत दीड लाख रुपये आहे.
त्याचसोबत मलायकाने हातात घड्याळ आणि सिल्वर कलरच्या हाय हिल्सने आपला लूक कंप्लीट केला होता.
पार्टीमध्ये सेलिब्रिटी खूप मस्ती करताना दिसून आले. सोशल मीडियावर या पार्टीतले मलायका आणि अर्जुनचे रोमॅन्टिक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमुळे मलायका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (PHOTOS- MANAV MANGALANI)
या पार्टीमध्ये मलायका व्यतिरिक्त करण जोहर, गौरी खान, नताशा पूनावाला, मनीष मल्होत्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.