PHOTO : एअरपोर्टवर कृती सेननचा क्लासी अंदाज; कलरफुल ट्रॅकसूटमध्ये सिम्पल लूक
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन मुंबई विमानतळावर पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी कृती ट्रॅकसूटमध्ये दिसून आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृती अत्यंत स्टायलिश अंदाजात दिसून आली. यावेळी कृतीने लाइट शेड ट्रॅक सूट वेअर केला होता. त्याचसोबत तिने हाय हिल्स, स्टायलिश आउटफिटऐवजी सिम्पल पण क्लासी लूक कॅरी केला होता.
कृती सेननचा ट्रॅकसूट क्लासी आणि ट्रेंडी होता. स्लीव्सपासून पायांपर्यंत दोन वेगवेगळ्या शेड्सचा हा ट्रॅकसूट स्टायलिश आणि क्लासी होता.
कृतीच्या अपकमिंग प्रोजेक्चबाबत बोलायचे झाले तर ती अक्षय कुमारसोबत आगामी चित्रपट बच्चन पांडेमध्ये दिसून येणार आहे. दोन महिन्यांपूर्वी या चित्रपटाची शुटींग पूर्ण झाली आहे.
बच्चन पांडे व्यतिरिक्त कृती एक बिग बजेट चित्रपटातही दिसून येणार आहे. तो चित्रपट म्हणजे, आदिपुरुष. ज्यामध्ये ती साऊथ स्टार प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
कृती आदिपुरुषमध्ये सीतेची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकरणार आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.