In Pics : मुंबईच्या रस्त्यांवर कपूर कुटुंबातील बहिणींची जोडी सायकलवरुन फेरफटका मारते तेव्हा...
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची बहिण खुशी कपूर नेहमीच चर्चेत असतात. अशातच अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूर दोघी बहिणी मुंबईतील रस्त्यांवर सायकल चालवताना दिसून आल्या. (फोटो - इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजान्हवी आणि खुशी दोघीही फिटनेस फ्रिक आहेत. यापूर्वी त्या सायकलिंग करताना दिसून आल्या आहेत. (फोटो - इंस्टाग्राम)
जान्हवी नेहमीच हटके लूक कॅरी करताना दिसते. तिच्या जिम लूकमधील फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यावेळीही जान्हवी डार्क शेड शॉर्ट्स आणि शॉर्ट टॉपमध्ये दिसून आली. (फोटो - इंस्टाग्राम)
खुशी कपूरबाबत बोलायचे झाले तर ती पिंक ट्रॅक पँट आणि व्हाइट टॉपमध्ये सायकलिंग करताना दिसून आली. (फोटो - इंस्टाग्राम)
खुशी कपूर सायकलिंग करतानाच्या फोटोंसोबतच काही इतर फोटोंमुळेही चर्चेत होती. खुशीने आपल्या खोलीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो - इंस्टाग्राम)
आपल्या खोलीचा फोटो शेअर करत खुशी कपूरनं कॅफ्शनमध्ये लिहिलं की, मी माझ्या बेडरुमची राजकुमारी. खरंच या फोटोमध्ये खुशीची रुम एखाद्या राजमहालातील सुंदर कक्षाप्रमाणे दिसत आहे. (फोटो - इंस्टाग्राम)