छावा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अवघ्या 4 दिवसांत कमावले 140 कोटी!

प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घासताना दिसतोय. या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा कधीच पार केला असून आज हा चित्रपट 150 रुपये कमवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाने सोमवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी भारतात एकूण 14 कोटी रुपयांची कमाई केली. आजदेखील या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड चालूच आहे.
हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पहिल्याच दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी या चित्रपटाने एकूण 31 कोटी रुपये कमवले. त्यानंतर शनिवारी या चित्रपटाने एकूण 37 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. शुक्रवारच्या तुलनेत ही कमाई 19.35 टक्के जास्त होती.
त्यानंतर रविवारी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी या चित्रपटाने एकूण 48.5 कोटी रुपये कमवले. सोमवारीदेखील या चित्रपटाने एकूण 24 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
म्हणजेच अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने एकूण 140.5 कोटी रुपये कमवलेत. जगभरात या चित्रपटाने 164.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
छावा या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केलेली आहे.
या फोटोंमध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसत आहे.
छावा चित्रपटातील एक दृश्य