Shivaji Maharaj Temple: भिवंडीत उभं राहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर, रामलल्लाची मूर्ती घडवणाऱ्या अरुण योगींनी काळ्या पाषाणापासून बनवली शिवरायांची मूर्ती

shivjayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर पाहून अचंबित व्हाल. भिवंडीच्या मराडे पाडा परिसरात हे 56 फुटी मंदिर उभारण्यात आले आहे.

Shivaji Maharaj Temple

1/10
भिवंडी वाडा रस्त्यावरील मराडे पाडा या ठिकाणी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर उभारले जात आहे.
2/10
तब्बल सात वर्षे सुरू असलेल्या या मंदिराचे काम पूर्णत्वास आले असून 17 मार्च या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी या मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
3/10
या मंदिरात अयोध्या येथील रामलल्लाची मूर्ती घडविणारे अरुण योगी यांच्या हातून सहा फूट अखंड कृष्णशीला पाषाणातून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घडविण्यात आली आहे.
4/10
तब्बल एक एकर जागेवर हे 56 फुटी मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर पुढील 400 वर्षे टिकेल, अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे.
5/10
या मंदिर बद्दल अनेकांकडून प्रशंसा केली जात आहे. भाजपा आमदार संजय केळकर यांना या मंदिरा बाबत माहिती कळताच त्यांनी या ठिकाणी भेट देऊन मंदिर परिसरातील कामाची माहिती करून घेत शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजुभाऊ चौधरी यांच्या मंदिर उभारणीच्या कार्याचे कौतुक केले आहे.
6/10
मी हे मंदिर बघून भारावून गेलो आहे. सर्वसामान्य वाड्यापाड्यांमधील सर्वसामान्य कुटुंबातील युवक एकत्र येतात. त्यांच्या मनात प्रेरणा येते की आपल्या हातून रोज शिवपूजन झाले पाहिजे, असे संजय केळकर यांनी म्हटले.
7/10
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे केवळ दैवत नाही तर देव आहे ज्यांनी महाराष्ट्राला नाही तर देशाला जागे केले.त्यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर या ठिकाणी उभे राहत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने या ठिकाणी भेट दिली पाहिजे. आम्हाला असाच तरुण अभिप्रेत आहे जो अशा कार्यातून देश घडवण्यासाठी योगदान देईल, असे वक्तव्य संजय केळकर यांनी केले.
8/10
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
9/10
शिवजयंतीला लोकार्पण झाल्यानंतर सामान्य नागरिकांना या मंदिरात जाता येणार आहे.
10/10
या मंदिराची रचना, सुबक नक्षीकाम, हिरवळ या गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.
Sponsored Links by Taboola